मौजे-सुकेणे ता.निफाड जि.नाशिक
npdmsukene@gmail.com
मौजे-सुकेणे ता.निफाड जि.नाशिक
npdmsukene@gmail.com
मौजे सुकेणे हे बाणगंगा नदीच्या काठावर वसलेले महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व कृषिप्रधान गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ४,४३० आहे. गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रे व आरोग्य उपकेंद्र यांमुळे गावकऱ्यांना मूलभूत आरोग्य व शैक्षणिक सुविधा मिळतात.
गावात विविध देवस्थाने आहेत ज्यामध्ये हनुमान, दत्त मंदिर, बनेश्वर महादेव यांसारखी मंदिरे गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. सामुदायिक सभागृह, पाणी साठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी यांसारख्या सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून अधिकतर शेतकरी द्राक्ष,कांदा, मका,गहू,टमाटे,बाजरी व हंगामी भाजीपाला यांसारखी पिके घेतली जातात. विशेषतःद्राक्ष, ऊस, टमाटे व कांदा या पिकांमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
मौजे सुकेणे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या आहेत. घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवणे तसेच हर घर नळ से जल, जलसंधारण व पाणीपुरवठा योजना राबवून गावात नियमित पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या पुढाकाराने गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. लोकसहभागातून घेतले जाणारे निर्णय आणि प्रगतिशील शेतीमुळे मौजे सुकेणे हे गाव आज नाशिक जिल्ह्यातील आदर्श गावांच्या दिशेने वाटचाल करत आहे.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
१०७२ हेक्टर
🏢 वार्ड संख्या
४
👥 पुरुष संख्या
२२८१
👥 स्त्री संख्या
२१४९
👥 कुटुंब संख्या
६५०
👥 एकूण लोकसंख्या
४४३०
मौजे सुकेणे हे गाव कृषीप्रधान आणि प्रगतशील जीवनशैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून द्राक्ष,कांदा, मका,गहू,टमाटे,बाजरी व हंगामी भाजीपाला यांसारखी पिके घेतली जातात. विशेषतःद्राक्ष, ऊस, टमाटे व कांदा या पिकांमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.शेती व्यतिरिक्त काही शेतकरी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच लहान-मोठ्या उद्योगांमध्येही कार्यरत आहेत.
गावात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आजही दृढपणे जपल्या जातात. वर्षभर साजरे होणारे उत्सव, ग्रामदैवतांची पूजाअर्चा आणि स्थानिक जत्रा हे गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. गणेशोत्सव, नवरात्र, होळी, दिवाळी यांसोबतच स्थानिक देवतांच्या जत्रांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, सहकार्यशील आणि “अतिथी देवो भव” या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. ग्रामविकासात लोकसहभाग मोठ्या प्रमाणात जाणवतो. महिलांचा सहभाग स्वयं-सहाय्यता गटांद्वारे प्रभावीपणे दिसून येतो, तर तरुण पिढी शिक्षण, खेळ व नोकरीच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
मौजे सुकेणेच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबत आधुनिकतेचा स्पर्शही आढळतो. त्यामुळे गाव विकास, परंपरा आणि एकतेचा उत्तम संगम घडवित आहे.
मौजे सुकेणे गावातील दत्त मंदिर हे प्राचीन असे मंदिर असुन ग्रामदैवताचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. महानुभाव पंथीयांसाठी हे एक ऐतिहासिक व पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे दरवर्षी दत्त जयंती व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरातून भाविक या यात्रेत सहभागी होतात. हे मंदिर गावकऱ्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानले जाते.
गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हनुमान मंदिर हे ग्रामस्थांचे अखंड श्रद्धास्थान आहे. हनुमान जयंतीला येथे धार्मिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच आठवडी भजन, सप्ताह व इतर धार्मिक कार्यक्रमही मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. सण-उत्सवांच्या काळात हे मंदिर ग्रामस्थांच्या एकत्र येण्याचे व संवाद साधण्याचे केंद्रस्थान ठरते.
🛕 बानेश्वर महादेव मंदीर
गावात एक प्रसिद्ध असे हे महादेव मंदिर आहे जे भाविकांचे एक खूप मोठे श्रद्धा स्थान आहे. ग्रामस्थ दर वर्षी महाशिवरात्रीचा दिवस सोहळ्या प्रमाणे साजरा करता. पंचक्रोशीत हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे.
मौजे-सुकेणे हे कृषिप्रधान गाव असून शेती हा येथील ग्रामजीवनाचा मुख्य आधार आहे. गावात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, कांदा, मका, गहू व हंगामी भाज्या यांची लागवड केली जाते. हिरवीगार द्राक्षबागा व कांद्याच्या शेतीमुळे परिसराला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे. गावातील अनेक शेतकरी फळे व भाजीपाला बाजारात पुरवून आर्थिक प्रगती साधत आहेत.
आर.आर.(आबा) स्मार्ट ग्राम पुरस्कार सन १७/१८ (१० लक्ष रुपये) देऊन सन्मानीत करण्यात आले.
तंटामुक्त गाव पुरस्कार १३/१४ (५ लक्ष रुपये) देऊन सन्मानीत करण्यात आले.
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्रीमती.नम्रता जगताप
(पंचायत समिती,निफाड)(उच्च श्रेणी)
1.श्रीमती. अबोली प्रदीप साळवे (ग्राम महसूल अधिकारी)
2.श्री. राजेश यादव चव्हाण (महसूल सेवक)
3.श्री. आनंद दादू पवार (पोलीस पाटील)
5.श्री. योगेश गंगाधर निरभवणे(सहाय्यक कृषी अधिकारी)